सिंधुताई

सिंधुताई ...  माझा जिव्हाळ्याचा विषय .. काल बातमी ऐकली अन मन सैरभर झाल.. जिने इतकं दिल जगाला तिच्याविषयी काय अन किती लिहायचे .. तरीही एक छोटा प्रयत्न.. 

माई जस बोलायच्या अगदी तसच वागायच्या .. हा एक पाया धरून हे काव्य लिहिले.. 


माय शिवाय घर नाही 

हे तुझेच बोल माई

तूच गेलीस सोडून अशी

सांग आता कुणा साद घालावी ।।


 स्वतःची माय गेली तर

 दुःख थोडे आवरता येते

 तू तर साऱ्या जगाचीच  माय

 सांग आता जगाने कसे सावरायचे ।।


गरीब  अनाथांची माय तू

भुकेल्यांची  भूक तू

ईश्वरचेच होतीस  रूप तू

नावाला सार्थ सिंधुताई तू ।।


 स्व अनुभवाने तू शिकवलेस साऱ्या जगाला

 दुःख मोठे नसतेच कोणाचे बाई

 पोटची पोर बाजूला ठेवलीस

 अन साऱ्या जगाचीच तू झालीस  आई ।।


 काट्यावरून चाल म्हणालीस

 फुलांचे चोचले ठेवायला सांगितलेले थोडेच असतात

 तू का ग अशी अर्धवट सोडून गेलीस

 खरे काटे आता तर इथे बोचतात ।।।


 ठेवलेस कोरडे दुःख स्वतःचे

 जगाच्या दुःखात सामील  झालीस

 रडावे दुःखासाठी की सुखासाठी जगावे

 सुखाची व्याख्या तर तूच शिकवलीस ।।


 सोडून जाणारे खूप असतात

 कोणाचे वाट पाहू नका

 म्हटलेस जे जे ते खरे केलेस

 अखेर आज तू सर्वांना पोरके केलेस।।


 तुझ्या जिद्दीला सलाम

 तुझ्या कार्याला सलाम

 तुझ्यासारखी आई दुसरी होणे नाही

 तुझ्या त्या मातृत्वाला सलाम ।।


 शीतल ....💐

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us