अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ आणि उद्योग क्षेत्रातील थांबलेली चाके पुन्हा नव्याने गतीमान करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय मोठय़ा ध्येयाने कामाला लागले असल्याचे मागील आठवडय़ापासून दिसून येत आहे. यामध्ये कॉर्पोरेट कर कपातीच्या निर्णयाची घोषणा आणि आता 3 ते 7 ऑक्टोबरमध्ये होणाऱया कर्ज वितरणासाठीच्या मेळय़ाव्याची घोषणा होय.
देशतील 250 जिल्हय़ामध्ये बँकांच्या अंतर्गत कर्ज वितरणासाठीच्या मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. विविध प्रकारच्या कर्ज वितरणाची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. दोन टप्प्यात या मेळाव्याचे आयोजन होणार आहे. दसऱयाच्या सणानंतर पुन्हा दिवाळीच्या आगोदरही अयोजन करण्यात येणार आहे. खासगी व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या याचाही सहभाग राहणार आहे.
येत्या तिमाहीत जीडीपीत वृद्धी
सरकार येत्या काळात शेवटच्या घरापर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा देणार आहे. त्यामुळे सर्वाचा राहणीमानाचा दर्जा सुधारत गेल्याचा फायदा देशाच्या आर्थिक विकास दर वृद्धी दर वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केला आहे.
Source : Tarun Bharat
No comments:
Post a Comment
Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.